छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : घरातील कुटुंबीयांना वरच्या मजल्यावर बाहेरून कडी लावून कोंडायचे आणि खालील मजल्यावरील घराचे कुलूप तोडून चोरी करायची, अशी शक्कल लढविणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना मुकुंदवाडी पोलिसांनी रंगेहात पकडले. शनिवारी (दि. २४) मध्यरात्री दीडच्या सुमारास सिडको विठ्ठलनगर परिसरातील पी-३ भागात ही घटना घडली. डायल ११२ वर मिळालेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि घरमालकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरवाजाच्या आडोशाला लपून बसलेल्या दोन्ही चोरट्यांना पोलिसांनी झडप घालून पकडले. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली. अनिल अंबादास माळवे (४५) आणि राहुल संजय जाधव (२२, दोघे रा. प्रकाशनगर, गल्ली नं. ५, मुकुंदवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे
आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.
याप्रकरणी फिर्यादी सुहास सुधाकर चौधरी (३२, रा. विठ्ठलनगर, सिडको) यांच्या तक्रारीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चौधरी घरात झोपलेले असताना, त्यांच्या दरवाजाची कडी बाहेरून कोणीतरी लावत असल्याचा आवाज त्यांना आला. त्यानंतर लगेचच तळमजल्यावरील बंद घराचा दरवाजा ठोठावण्याचा आणि कुलूप उचकटण्याचा आवाज आला.
त्यामुळे चौधरी यांनी तात्कळ स्वतःच्या मोबाईलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता, दोन इसम तळमजल्यावरील दरवाजा लोखंडी गजाने तोडताना दिसले. त्यांनी कसलाही आरडाओरड न करता तातडीने डायल ११२ क्रमांकावरून घटनेची माहिती दिली. मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे गस्तीवरील पथक अवघ्या काही मिनिटांत सायरन वाजवत घटनास्थळी दाखल
दोघांविरुद्ध गंभीर गुन्हे
▶ दोघेही सराईत गुन्हेगार असून अनिल माळवे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दरोडा, लूटमार, घरफोडी, खंडणी, गांजा विक्री संदर्भात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का व एमपीडीए अंतर्गत कारवाईही झालेली आहे. तसेच राहुल जाधव याच्यावरही यापूर्वी
गंभीर गुन्हे नोंद आहेत
झाले. पळून जाण्याचा मार्ग बंद झाल्याने तळमजल्यावरील मुख्य दरवाजाच्या आडोशालाच लपून बसले. चौधरी यांनी पहिल्या मजल्यावरून पोलिसांना फोन करून, चोरटे दरवाजाच्या बाजूलाच लपून बसले आहेत, अशी अचूक माहिती दिली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. दोघांकडून घरफोडीसाठी आणलेले दोन लोखंडी गज आणि दोन धारदार चाकू असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












